Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यात गेल्या 24 तासात 28,286 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 75,35,511 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 21,941 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 70,89,936 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
Maharashtra Corona Update
Maharashtra Corona UpdateSaam Tv
Published On

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 28,286 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 75,35,511 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 21,941 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 70,89,936 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. (Maharashtra Corona Update)

गेल्या 24 तासात 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,42,151 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,99,604 रुग्ण अॅक्टीव आहेत.

Maharashtra Corona Update
Wardha Accident: कार पुलाखाली कोसळून सात जण ठार, भाजप आमदाराच्या मुलाचा समावेश

ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती

राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2845 वर पोहोचली आहे. तर, 1454 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 राज्यात 86 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 47 रुग्ण नागपूर तर 28 रुग्ण पुण्यात आढळून आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com