Anna Hazare Death Threat: 'राळेगणसिद्धीला जाऊन ठार मारेन', ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी

Anna Hazare Latest News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी
Anna Hazare Latest News
Anna Hazare Latest NewsSaam TV

Anna Hazare Death Threat: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एवढेच नाही तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने त्यांना ठार मारण्याची तारीखही जाहीर केली आहे. शेतीच्या वादातून त्यांना हत्येची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे यांना धामी देणाऱ्याचे नाव संतोष गायधने असे आहे. संतोष गायधने यांच्या म्हणण्यानुसार, एका गटातील 96 जणांनी त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर दबाव टाकून शेतीच्या वादात खोटे गुन्हे दाखल केले. त्याचे कुटुंब दहशतीमध्ये जगत आहे. याप्रकरणी संतोष गायधने याने अण्णा हजारे, पोलिस आणि मंत्र्यांकडे तक्रारही केली मात्र कारवाई झाली नाही. यामुळे त्यांचे कुटुंबीय निराश आहेत.

Anna Hazare Latest News
Nagpur Crime News: 'मुलीची हत्या करण्यासाठी जातोय, थांबू शकत असाल तर थांबवा', माथेफिरू प्रेमीच थेट पोलिसांना आव्हान

राष्ट्रपतींकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी

संतोष गायधने याने राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागितली होती. मात्र त्याला ही परवानगी नाकारण्यात आली. सगळीकडून निराशा होतं असल्याने संतोष गायधने याने थेट अण्णा हजारे यांना जीवे मारण्याचा इशारा दिला. 1 मे रोजी अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या राळेगणसिद्धी गावात जाऊन त्यांची हत्या करणार असल्याचे संतोष गायधने यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Anna Hazare Latest News
Pune Crime News: पंतप्रधान मोदी, सोनिया गांधींचे व्हिडीओ केले मॉर्फ, पुण्यातून एकाला अटक

काय आहे प्रकरण?

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे संतोष गायधने याची जमीन आहे. शेतीच्या वादातून गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यावर व कुटुंबावर अन्याय होत असल्याचे संतोषचे म्हणणे आहे. अण्णा हजारे यांच्या गावातील प्रशासनाकडेही त्याने तक्रार केली, मात्र पदरी निराशाच आली. हतबलता इतकी वाढली की 1 मे महाराष्ट्र दिनी अण्णा हजारी यांच्या हत्येचा इशारा त्याने दिला आहे, असं त्याच म्हणणं आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने अण्णा हजारे यांच्या गावात खळबळ उडाली आहे. अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या धमकीबाबत सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com