Pm Narendra Modi Morphed Video: पिंपरी चिंचवड सायबर सेलने वरिष्ठ भाजप आणि काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांचे व्हिडीओ मॉर्फ करून यूट्यूबवर (YouTube) अपलोड केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी शमीम जावेद अन्सारी असल्याचं सांगितलं जात असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi), काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे व्हिडीओ मॉर्फ करून यूट्यूबवर अपलोड करायचा.
याप्रकरणी भाजपचे (BJP) माजी खासदार अमर साबळे यांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलमध्ये (Pimpri Chinchwad Cyber Cell) तक्रार दाखल केली होती. अन्सारीने कथितरित्या यूट्यूब (YouTube) आणि इतर प्लॅटफॉर्मवर प्रमुख राजकीय नेत्यांचे मॉर्फ केलेले व्हिडीओ पोस्ट केले होते. (Latest Marathi News)
पोलीस गेल्या तीन महिन्यांपासून अन्सारीचा शोध घेत होते आणि अखेर स्थानिक पोलिसांच्या (Police) मदतीने त्याला झारखंडमधील रांची येथे पकडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, एक हजाराहून अधिक व्हिडीओ यूट्यूबवरून शोधण्यात आले आहेत. राजकीय नेत्यांच्या प्रतिमा आणि रेकॉर्डिंगमध्ये बदल करणे आणि त्यांचा अपमानजनक मार्गाने वापर करणे कायद्याच्या विरोधात आहे.