Nagpur Crime News: 'मुलीची हत्या करण्यासाठी जातोय, थांबू शकत असाल तर थांबवा', माथेफिरू प्रेमीच थेट पोलिसांना आव्हान

One Sided Love Crime News : विनयभंग करत विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam TV

Nagpur Latest Crime News : नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका माथेफिरू रोड रोमियोने थेट पोलिसांना आव्हान दिलं आहे. या माथेफिरू तरुणाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करत, मी मुलीच्या घरी तिची हत्या करायला जात आहे. थांबू शकत असाल तर थांबवा'', असं थेट आव्हान त्याने पोलिसांना दिलं. यानंतर हा तरुण मुलीच्या घरी गेला. संजू तिवारी असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार राणा प्रताप नगर पोलिसांच्या हद्दीतील आहे. माथेफिरू तरुण हा त्याच्या ओळखीच्या एका मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. या दोघांचेही मैत्रीचे संबंध होते. परंतु मुलाला या पेक्षा पुढे वाढत हे नाते प्रेमसंबंधात बदलायचे होते. मात्र मुलीला हे मान्य नव्हतं.

Nagpur Crime News
Pune Crime News: पंतप्रधान मोदी, सोनिया गांधींचे व्हिडीओ केले मॉर्फ, पुण्यातून एकाला अटक

यामुळेच संतापलेल्या या तरुणाने मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. या मुलाने तिचा विनयभंग करत तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. इतकंच काय तर त्याने मुलीच्या घरी जात मोठं भांडणही केलं होतं. (Latest Marathi News)

हा माथेफिरू तरुण इतक्यावरच थांबला नाही. त्याची मजल इतकी वाढली की, त्याने थेट पोलिसांनाच आव्हान दिलं. या तरुणाने पोलिसांना मुलीच्या घरी जाऊन तिची हत्या करणार असल्याचे सांगितले आणि तिच्या घरी गेला. मुलीच्या घरी आल्यानंतर या तरुणाने मोठी भांडण करत मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने जोरजोरात ओरडत मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली.

Nagpur Crime News
Karnataka assembly elections 2023: विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात दूधावरून राजकीय संघर्ष, अमूल की नंदिनी; नेमका काय आहे वाद?

हा संपूर्ण प्रकार सुरु असताना मुलीच्या आईने पोलिसांना (Police) फोन करत घडलेल्या घटनेची माहिती दिली. मुलीच्या आईच्या फोननंतर पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाली आणि या माथेफिरुला अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com