अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर (Dr Balaji kinikar) यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार बालाजी किणीकर यांना धमकीचे निनावी पत्र पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच किणीकर यांना ठार मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर हे देखील त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आहेत. अंबरनाथमध्ये आमदार किणीकर यांना आज एका अज्ञात इसमाने पत्राद्वारे धमकी पत्र पाठवलं आहे. याबाबत किणीकर यांचे ऑफिस क्लार्क प्रकाश भोगे यांनी अंबरनाथ मधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या धमकी निनावी पत्राबाबत महिती देऊन तक्रार अर्ज सादर केलाय. या पत्रात सदर इसमाने त्यांना गोळी मारून ठार असल्याची धमकी दिली आहे.
या पत्रातील मजकूर
आमदार बालाजी तेरेको गोली मारनेका दिन आ गया हे, हामारे अंबरनाथ के शिवसेना नेता को तकलीफ देता है इसिलिए तुझे मारनेका हे, बता इसलिये रहा हु जब में मारूंगा वह दिन तय हे तब तक टू रोज डर डर के जिये.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.