Dharashiv News : इंजेक्शन दिल्यानंतर दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू? आई-वडिलांचा गंभीर आरोप

इंजेक्शन दिल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप बाळाच्या आई-वडिलांनी केला आहे.
injection
injectionSaam TV
Published On

>> कैलास चौधरी

धाराशिव : दोन महिन्याच्या बाळाचा पेंटाचे इंजेक्शन दिल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील जुनोनी येथे घडली आहे. इंजेक्शन दिल्यानेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आई-वडिलांनी केला आहे.

आज (२ मार्च) दुपारी गावातील अंगणवाडीमध्ये बाळाला तीन इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर काही तासातच बाळाचा मृत्यू झाला. बाळ उठत नसल्याने नातेवाईकांनी बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले.

तिथे डॉक्टरांनी तपासणी करून बाळाला मृत घोषित केलं. शवविच्छेदनाचा अहवाल आल्याशिवाय बाळाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. (Latest News)

injection
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याची शक्यता, विरोधक आक्रमक

इंजेक्शन दिल्यानंतर बाळ अर्धा तास खेळत होतं, त्यानंतर काही वेळ झोपलं. मात्र त्यानंतर बाळ उठलंच नाही, अशी माहिती बाळाच्या वडिलांनी दिली.

बाळाला तीन इंजेक्शन दिले होते. अंगणवाडीत बाळाला इंजेक्शन दिलं होतं. मात्र त्यानंतर बाळ उठत नव्हतं म्हणून दवाखान्यात नेलं तर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्याची माहिती आईने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com