CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याची शक्यता, विरोधक आक्रमक

उद्याच विरोधकांकडून हक्कभंग दाखल होण्याची शक्यता आहे.
Maharashtra CM Eknath Shinde News
Maharashtra CM Eknath Shinde NewsSaam TV

मुंबई : मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना देशद्रोही संबोधल्याप्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. विधानसभेत विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हककभंग दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्या विरोधात विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांकडून हक्कभंगाची सूचना देण्यात आली आहे. यानंतर विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची तयारी विरोधकांनी सुरु केली आहे. उद्याच विरोधकांकडून हक्कभंग दाखल होण्याची शक्यता आहे. (Political News)

Maharashtra CM Eknath Shinde News
Eknath Shinde News:...तर एकदा नव्हे 50 वेळा तो गुन्हा करेन; 'देशद्रोही' विधानावरून CM शिंदे यांचा खुलासा

विरोधकांवर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटलं होतं. यावरुन संजय राऊत यांच्याविरोधात बुधवारी 1 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांत चौकशी करून याबाबतचा अहवाल 8 मार्च रोजी सादर करणार असल्याचं सांगितलं आहे.

Maharashtra CM Eknath Shinde News
Kasba byelection 2023 : कसब्यात रविंद्र धंगेकरांचा विजय 'मनसे'मुळे सोपा झाला? अजित पवारांची प्रतिक्रिया बरंच काही सांगून गेली

दुसरीकडे अजित पवार यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना सरकारबाबत केलेल्या 'महाराष्ट्रद्रोही' या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. विधानपरिषदेत प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाच्या सूचनेचं पत्र उपसभापतीना दिले आहे.

त्यानंतर आता देशद्रोह्यांबरोबर चहापान टळले या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. देशद्रोह्याला देशद्रोही बोलणं गुन्हा असेल तर, तो गुन्हा मी ५० वेळा करेन, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com