Eknath Shinde News:...तर एकदा नव्हे 50 वेळा तो गुन्हा करेन; 'देशद्रोही' विधानावरून CM शिंदे यांचा खुलासा

'द्रोह्याला देशद्रोही बोलणं हे चुकीच असेल तर, तो गुन्हा मी ५० वेळा करेन, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSAAM TV
Published On

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही वक्तव्यावरून खुलासा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोह्यांबरोबर चहापान टळले असे विधान केले होते. त्यावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणावा अशी मागणी केली होती. यावरून मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. 'द्रोह्याला देशद्रोही बोलणं गुन्हा असेल तर, तो गुन्हा मी ५० वेळा करेन, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

आज विधिमंडळातील अधिवेशनचा चौथा दिवस आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या देशद्रोही विधानावरून खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, ' सदस्यांनी परिषदेत माझा विरोधात जो हक्कभंग आणला आहे. ते वक्तव्य विरोधीपक्ष नेते यांच्याबाबत नव्हते. नवाब मलिक यांचे संबध देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीशी होते. गोवावाला कंपाऊडची जमिनीवर मलिकांनी अवैध कब्जा घेतला. नवाब मलिक यांनी हसीना पारकर यांच्याकडून जमीन घेतली. ९३ सालच्या बॉम्बच्या स्फोटातील आरोपीचाही यात सहभाग आहे'.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Chinchwad By Election: 'त्यामुळेच चिंचवडमध्ये पराभव...' अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; कोणावर फोडले खापर?

'नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक झाली. 'एनआयए'नेही चौकशी केली. नवाब मलिकांची यात मालमत्ता जप्त झाली आहे. त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. देशद्रोही नवाब मलिक यांचा मी उल्लेख केला. त्यांचे देशद्रोह्यासोबतचे संबध समोर आलेले आहेत. त्या मलिक यांचा राजीनामा यांनी घेतला नाही. त्यांना पाठिशी घातलं. त्यावेळी मी बर झालं चहापान त्यांच्यासोबत टळला, असं मी बोललो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Kasba Peth Election Result: बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

'अंबादास दानवेजी तुम्हाला हे योग्य वाटतं का? देशद्रोह्याना पाठीशी घातलं म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली. अजित दादांना मी देशद्रोही म्हटलो नाही. या वक्तव्याला राजकीय रंग देऊ नये. या देशद्रोह्याचं समर्थन आपण करता का? देश द्रोह्याला देशद्रोही म्हणणं बोलणं हे गुन्हा असेल तर मी हा गुन्हा ५० वेळा करेन, असं ठणकावून सांगत मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही वक्तव्यावरून खुलासा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com