Pune Mountain Cracked : भिमाशंकरच्या कुशीत 'इर्शाळवाडी', डोंगराला ३०० मीटर भेगा पडल्याने पदरवाडीतील ८० कुटुंबांचा जीव टांगणीला

Pune News Update : भिमाशंकरच्या डोंगर कड्यावरील पदरवाडी येथील डोंगराला भेगा पडल्या आहेत.
Pune Bhimashankar Mountain Cracked
Pune Bhimashankar Mountain CrackedSaam TV
Published On

Pune News : रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटना ताजी असताना पुण्यातील भिमाशंकर येथेही तशीची काहीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भिमाशंकरच्या डोंगर कड्यावरील पदरवाडी येथील डोंगराला भेगा पडल्या आहेत.

डोंगर कड्याला ३०० मीटरपर्यंत भेगा पडल्या आहेत. यामुळे पदरवाडी गावच्या १५ कुटुंबातील ८० जणांचा जीव टांगणीला लागला आहे. १०० हून आधिक जनावरांचे वास्तव्य येथे धोक्यात आले आहे. (Live Marathi News)

Pune Bhimashankar Mountain Cracked
Nandurbar Accident News: दुचाकीची धडक देत कार कोसळली नाल्यात; लहान मुलीसह ५ जखमी

भिमाशंकर पदरवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने डोंगर कडा कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत अप्पर तहसीलदार नेहा शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. (Pune News)

Pune Bhimashankar Mountain Cracked
Devendra Fadnavis On Barsu Protest: बारसूतील आंदोलकांना बंगळुरूतून फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

सध्या सुरु असलेल्या मुसळधार पाऊस आणि धुके यामुळे या परिसरात मदतकार्याची परिस्थिती अवघड आहे. यामुळे पदरवाडीचे तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी आता केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com