Dagdi Chawl 2 : 'डॅडी' पुन्हा पडद्यावर झळकणार, 'दगडी चाळ २' चा ट्रेलर प्रदर्शित

'चुकीला माफी नाही', हे शब्द कानावर पडले की, दगडी चाळीत भल्याभल्यांच्या अंगावर शहारे यायचे, कारण...
Dagdi Chawl 2 trailer launch with Arun Gawli
Dagdi Chawl 2 trailer launch with Arun Gawlisaam tv
Published On: 

मुंबई : चुकीला माफी नाही, हे शब्द कानावर पडले की दगडी चाळीत भल्याभल्यांच्या अंगावर शहारे यायचे. कारण अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawli) यांनी दिलेला आदेश अख्ख्या दगडी चाळीत दुमदुमत असे. डॅडी उर्फ अरुण गवळी आणि अंडरवर्ल्ड एकेकाळी हे समीकरणचं बनलं होतं. याच समीकरणाचं अवघड गणित मराठी सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावर आलं आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) स्टारर दगडी चाळ सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. पण आता तोच जल्लोष आणि तोच उत्साह घेवून पुन्हा एकदा पडद्यावर 'दगडी चाळ २' (Dagdi chawl 2 Movie) सिनेमा झळकणार आहे. विशेष म्हणचे खुद्द अरुण गवळी यांच्याहस्ते दगडी चाळ परिसरात दगडी चाळ २ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी अंकुश चौधरी आणि अभिनेत्री पूजा सावंत उपस्थित होत्या.

सलमान खानने दिल्या शुभेच्छा

दगडी चाळ २ सिनेमात अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत यांनी मु्ख्य भूमिका साकारली असून या सिनेमाची तुफान चर्चा आहे. अभिनेता सलमान खानही या सिनेमाच्या प्रेमात पडला असून त्याने सिनेमाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने इंस्टाग्रामवर दगडी चाळ २ सिनेमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'राघू पिंजऱ्यात आला' या गाण्याचा व्हिडिओ सलमाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. कारण व्हिडिओमध्ये एक खासीयत आहे. सलमानची जवळची मैत्रिण डेजी शाह या गाण्यात ठुमके मारताना दिसणार आहे. त्यामुळे सलमानलाही हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

Dagdi Chawl 2 trailer launch with Arun Gawli
आतापर्यंत मी शांत होतो, कदाचित चित्रा वाघ यांना माहित नसेल, संजय राठोड यांचा सणसणीत इशारा

वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं, तर दगडी चाळ २ सिनेमा १९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अरुण गवळी उर्फ डॅडीचा रुबाब पाहायला मिळणार आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या कपड्यांचा पेहराव, डोक्यावर गांधी टोपी, पिळदार मिशा, डोळ्यांत तळपत्या ज्वाळा आणि चुकीला माफी नाही, असा एकच आदेश देणारे अरुण गुलाब गवळी सिनेमाच्या माध्यमातून पु्न्हा एकादा पडद्यावर झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com