पर्यावरणाच्या रक्षणासाठी आठ मित्रांची कन्याकुमारी ते काश्मीर सायकल सवारी

6 जानेवारीला ते कन्याकुमारी या ठिकाणी पोहोचणार असून त्या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी लोकांना मार्गदर्शन करणार आहेत.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आठ मित्रांची कन्याकुमारी ते काश्मीर सायकल सवारी
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आठ मित्रांची कन्याकुमारी ते काश्मीर सायकल सवारीविनोद जिरे
Published On

बीड - पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन आठ पर्यावरणप्रेमींनी कश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकल वरून प्रवास सुरू केला आहे. पुणे येथील मावळ अथेटिक असोसिएशनच्या 8 मित्रांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देत, 24 डिसेंबरला काश्मीर मधल्या श्रीनगर पासून आपली सायकल यात्रा सुरू केली आणि 14 दिवसांमध्ये ते कन्याकुमारी या ठिकाणी पोहोचणार आहेत.

हे देखील पहा -

एकूण 3 हजार 700 किलोमीटरचा हा प्रवास असून 10 राज्यातून ही सायकल यात्रा जाणार आहे. यामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेशत ते देणार आहेत. दररोज 250 किलोमीटरचा प्रवास ते या सायकलवरून करतात, आज त्यांची सायकल यात्रा बीडमध्ये दाखल झाली होती.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी आठ मित्रांची कन्याकुमारी ते काश्मीर सायकल सवारी
Viagraने वाचवले 45 दिवस कोमात असलेल्या कोरोनाग्रस्त नर्सचे प्राण

स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव वेगवेगळ्या उपक्रमांमधून साजरा केला जात आहे. त्यामुळे या 8 मित्रांनी एकत्र येऊन एक सामाजिक संदेश देऊन स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा पण घेतला आहे आणि ही सायकल यात्रा सुरू केली आहे. 6 जानेवारीला ते कन्याकुमारी या ठिकाणी पोहोचणार असून त्या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी लोकांना मार्गदर्शन करणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com