नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा डोकं वर करत आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनामुळे 37 वर्षीय नर्स मोनिका अल्मेडा तब्बल 45 दिवस कोमात होती. डॉक्टरांनी व्हायग्राच्या मदतीने या नर्सचा जीव वाचवला आहे. शुद्धीवर येताच या नर्सने डॉक्टरांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. मोनिकाला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी इरेक्टाइल डिसफंक्शनच्या म्हणजेच व्हायग्रा या औषधाचा वापर केला.
हे देखील पहा -
कोरोनामुळे मोनिकाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही खूप कमी झाली होती. शुद्धीवर आल्यावर नर्स मोनिकाने सांगितले की, मला शुद्ध आली तेव्हा मला माझ्या डॉक्टरांनी सांगितले की, माझा जीव हा केवळ व्हायग्रामुळे वाचला आहे. ४८ तासांत माझी फुफ्फुस काम करू लागली. मला दमा असल्यामुळे माझी ऑक्सिजनची पातळी कमी होत होती.
सुरुवातीला मला ही गोष्ट मस्करी वाट होती. मात्र खरंच मला व्हायग्राचा हेवी डोस दिला होता. त्यामुळे तिच्या शरीरावर चांगला परिणाम झाला अशी माहिती मोनिकाने दिली आहे.एनएचएस लिंकनशायरमध्ये मोनिका कोरोनाबाधित रुग्णांना उपचार देत होती. तेव्हा ऑक्टोबर 2021 मध्ये मोनिकाला कोरोनाची लागण झाली आणि हळूहळू तिची तब्बेत बिघडू लागली. नर्सची बिघडलेली प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिच्या उपचारासाठी व्हायग्राचा वापर केला. मोनिकाला ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी 6 वाजता रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली ती आता पूर्वीपेक्षा बरी असून तिच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.