
अहमदाबादमध्ये मृत्यूचं थैमान घालणारा विमान अपघातामागे सायबर हल्ल्याचं कारण आहे का? अशी शंका उपस्थित केली जातेय. मात्र विमानावर सायबर हल्ला शक्य आहे का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
अहमदाबादमध्ये धडकी भरवणारा विमान अपघात झाला. त्यात तब्बल 274 जणांचा मृत्यू झालाय. हा अपघात पायलटच्या चुकीमुळे झाला की तांत्रिक कारणांमुळे याचा तपास सुरु आहे.. मात्र संजय राऊतांनी अवघ्या 30 सेकंदात घडलेल्या या भीषण अपघाताबद्दल सायबर हल्ल्याची शंका उपस्थित केलीय.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तान तणाव वाढलाय. त्यातच पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या टर्किश कंपनीचे विमानतळांवरील कंत्राट रद्द करण्यात आलेत. त्यामुळे या अपघातामागे सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. तर अहमदाबादमधील अपघातानंतर या प्रकरणात एनआयए, आयबी आणि एटीएसची एण्ट्री झालीय. त्याची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात. विमान अपघातामागे सायबर हल्ल्याची शंका उपस्थित केली जात असल्याने या प्रकरणामागच्या सर्व शक्यशक्यतांचा तपास सुरु असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय.
याआधी 2016 मध्ये अमेरिकेत, 2024 मध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानावर मालवेअर हल्ला आणि 2025 मध्ये म्यानमारमध्ये विमानाच्या जीपीएस यंत्रणेवर हल्ला करुन विमान चुकीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताच्या विमानांना लक्ष करणारी यंत्रणा पाककडे असल्याचा दावा केला होता. त्याचा काही संबंध या अपघातामागे आहे का? खरंच हा अपघात आहे की दहशतवाद्यांकडून केलेला घातपात? हे सखोल तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र हा घातपात असेल तर यामागे असलेल्या देशविरोधी शक्तींना परिणाम भोगावे लागतील, हे मात्र निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.