SSC-HSC परीक्षा कॉपीमुक्ती करण्यासाठी गरज पडल्यास कर्फ्यु लावणार; अहमदनगर जिल्हा परिषदेचा निर्णय

अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी याबाबत दिली आहे.
SSC HSC Exam
SSC HSC Exam Saam Tv
Published On

>> सुशील थोरात

अहमदनगर : दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अहमदनगरमध्ये गरज पडल्यास कर्फ्यु लावणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे.

अहमदनगरमध्ये बारावीच्या परीक्षेसाठी 108 केंद्र असून 63 हजार 313 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर दहावीसाठी 179 परीक्षा केंद्र असून 69 हजार 534 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्ती अभियानाच्या अंतर्गत जिल्हास्तरावर सहा भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच तालुकास्तरावर देखील स्थानिक भरारी पथक नेमले जाणार आहेत. (Ahmednagar News)

SSC HSC Exam
Shiv Jayanti 2023 : ...तर लोकांना शिवाजी महाराज कळले नसते; शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळ्यातील अमित शहांचं वक्तव्य चर्चेत

जिल्ह्यात कोणतेही परीक्षा केंद्र अतिसवेधीनशील नसले तरी 16 संवेदनशील परीक्षा केंद्र जाहीर करण्यात आली आहेत. या परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे. या सोबतच काही केंद्रांवर व्हिडिओग्राफी देखील करण्यात येणार आहे.

SSC HSC Exam
KL Rahul: केएल राहुल सारखा खराब ओपनर पाहिला नाही, व्यंकटेश प्रसादचा निशाणा

परीक्षा केंद्रावर जमाबंदी आदेश लागू असणार आहेत. गरज पडल्यावर कलम 144 प्रमाणे कर्फ्यू लागू करण्याची देखील तयारी जिल्हा प्रशासनाची आहे. कॉपी करणाऱ्यास मदत करणाऱ्याची कसलीही हयगय केली जाणार नाही, अशी माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com