प्रस्थानसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये २८ जूनपासून संचारबंदी

भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून तसे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
प्रस्थानसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये २८ जूनपासून संचारबंदी
प्रस्थानसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये २८ जूनपासून संचारबंदीSaamTv
Published On

रोहिदास गाडगे

आळंदी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ( Dnyaneshwar Mharaj) पालखी प्रस्थान सोहळा व आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. प्रस्थान सोहळ्याला जमणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून 28 जून ते 4 जुलै या दरम्यान आळंदी शहरात व परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. Curfew in Alandi from June 28

हे देखील पहा -

आळंदी Alandi परिसरामध्ये आषाढी Ashadhi पायी वारीनिमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक येत असतात. राज्याच्या विविध भागातून या ठिकाणी भाविक येणायची शक्यता आहे. कोरोना Corona निर्बंध Restrictions बऱ्याच अंशी शिथिल केल्यामुळे, भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस Police आयुक्तांनी Commissioner हा निर्णय घेतला असून तसे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

प्रस्थानसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये २८ जूनपासून संचारबंदी
26 एकर जमीन झाली बाप्पांच्या नावावर !

उद्यापासून (28 जून) ते 4 जुलै या कालावधी मध्ये, आळंदी मधील सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक पूर्णतः बंद राहणार असल्याचे देखील या आदेशात नमूद करण्यात आले आहे, नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आळंदी परिसरातील अत्यावश्यक वाहने तसेच स्थानिक नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश खुला राहणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com