औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू; पंढरपुरात मनसेचे आंदोलन

औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर राज्यभरातील मनसे आक्रमक झाली आहे.
औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू; पंढरपुरात मनसेचे आंदोलन
औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू; पंढरपुरात मनसेचे आंदोलनSaamTvNews

पंढरपूर : औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याची घोषणा खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सभेला अद्यापही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या या सभेला जोरदार विरोध होत आहे. राज ठाकरेंच्या या सभेमुळे औरंगाबाद शहराच्या शांततेस बाधा निर्माण होऊ शकते अशी भीती शिवसेनेकडून (Shivsena) व्यक्त करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

त्यातच आता या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये (Aurangabad) पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मनसेची हि सभा होणार का? पोलिसांकडून सभेस परवानगी दिली जाणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर राज्यभरातील मनसे आक्रमक झाली आहे. पंढरपूर (Pandharpur) शहरात देखील मनसेकडून जमावबंदीच्या आदेशाविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादमधील सभा होणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.

औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू; पंढरपुरात मनसेचे आंदोलन
राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर; औरंगाबादच्या सभेला पुण्यातून होणार रवाना

औरंगाबाद मध्ये कोणत्याही परिस्थितीत १ मे महाराष्ट्र दिनी हिंदूजननायक राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचा निर्धार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे. औरंगाबाद मध्ये 9 मे पर्यंत जमावबंदीचा आदेश प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा होणार की नाही याबद्दल मनसैनिकात संभ्रम आहे. पण, दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू; पंढरपुरात मनसेचे आंदोलन
अनिल देशमुखांना दिलासा? चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला

औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला पोलिसांकडून परवानगी मिळो अथवा न मिळो सभा होणार असल्याची भूमिका मनसेकडून घेण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांकडून मराठवाडा सांस्कृतिक मंडळाऐवजी गरवारे स्टेडियमवर सभा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, सांस्कृतिक मंडळावरच सभा घेण्याचा मनसेचा हट्ट आहे. या सभेला परवानगी देण्याचा निर्णय अद्यापही पोलीस प्रशासनाने घेतलेला नाही. दरम्यान, जर सभेला परवानगी मिळाली नाही तर न्यायालयाकडे (Court) दाद मागण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com