
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या लेटरबॉम्बची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चांदीवाल कमिशनचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. या अहवालामध्ये परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेले आरोप हे कळते समजतेच्या आधारावर केल्याची नोंद आहे. त्यामुळे या प्रकरणात आता गृहमंत्र्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
चांदिवल आयोगाचा अहवाल गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला असून हा अहवाल २०१ पानांचा आहे. हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल हे या आयोगामध्ये चौकशी करत होते.
हे देखील पाहा -
ज्या अधिकाऱ्यांची नावे परमबिरसिंह यांनी त्यांच्या तक्रारीत नोंदवली होती त्यांनीही देशमुखांकडून पैसे मागण्यात येत असल्याच्या वृत्ताचे खंडण केले होते. परमबीर सिंह यांनी जे आरोप केले होते. ते कळते समजतेच्या आधारावर केल्याची नोंदही चांदीवाल आयोगाच्या अहवालात असल्याने अनिल देशमुख यांनी क्लीनचिट मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
काय होता आरोप -
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप करताना त्यांनी 100 कोटी रुपये वसुलीचे आदेश दिल्याचं सांगितलं होतं.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.