नवनीत तापडिया
औरंगाबाद - उद्योगनगरी वाळूज औद्योगिक परिसरातील बंद पडलेल्या एका कंपनीत धडा वेगळे शिर असलेले मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या मृतदेहाची ओळख पटवून या प्रकरणी पुण्यातील दोन आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
अजय असे मृताचे नाव आहे तर निखील गरड आणि प्रतिक शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांमध्ये दारू पिऊन झालेल्या किरकोळ वादातून आरोपी निखिल आणि प्रतिक यांनी बंद पडलेल्या कंपनीत नेऊन अजयचे धडा वेगळे शीर करून त्याचा खून केला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी (Police) दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय.
ही धक्कादायक घटना १५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. दरम्यान मृताच्या हातावर छत्रपती लिहिलेले असल्याची माहिती दिसून आली आहे. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेने वाळूज औद्योगिक वसाहत परिसरात खळबळ माजली होती. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.