Beed News: गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना त्यांच्याच पक्षातून डावलले जात असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पंकजा मुंडे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला गैरहजर होत्या. त्यामुळे पंकजा मुंडेंची नाराजी जाहीरपणे दिसली होती.
काही दिवसांपूर्वी त्यांना शिवसेना पक्षात येण्याची ऑफरही देण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या सगळ्या नाराजी नाट्यावर स्वतः भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे. (Panjaka Munde)
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पक्षातील नाराजीबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना "भाजपच्या कुशीतील वाढलेली मी खरीखुरी कार्यकर्ता आहे.भाजप आणि मुंडे साहेब यांना कधीही वेगळं करता येणार नाही,"अस म्हणत पंकजा मुंडे यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
याबद्दल पुढे बोलताना, "भाजप पक्ष हा काही एक व्यक्ती नाही ती संस्था आहे असे म्हणत त्यांनी नाव न घेता देवेद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. तसेच भाजपाचे सर्व प्रोटोकॉल मी पाळले आहेत," असेही त्या यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे बीडच्या गेवराई येथे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. या जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.