Mumbai Crime News: गेम खेळण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीच्या डोळ्याला पट्टी बांधून तरुणाचं संतापजनक कृत्य

Shocking Act With Minor Girl : या धक्कादायक प्रकारानंतर घाटकोपर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Ghatkopar Crime News
Ghatkopar Crime Newssaam tv

>> सचिन गाड, साम टीव्ही

Ghatkopar Crime News: खेळ खेळताना १० वर्षीय मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिंच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मुंबईच्या घाटकोपरमध्ये घडली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर घाटकोपर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राजू असं अटकर करण्यात आलेल्या ३० वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

Ghatkopar Crime News
Sanjay Raut News: संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरू होती, अचानक साप निघाला, उडाला एकच गोंधळ

मिळालेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी पीडित मुलगी घरात एकटी असल्याचं बघून राजूने तिच्या घरात प्रवेश केला. तसेच आरोपीने खेळण्याच्या बहाण्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. १५ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची वाच्याता पीडित मुलीने नातेवाईकांकडे केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. (Breaking News)

Ghatkopar Crime News
Shocking News: बायकोने १० वर्षात ७ वेळा नवऱ्याला तुरुंगात पाठवलं, प्रत्येकवेळी स्वत:च सोडवून आणलं; कारण चक्रावणारं

नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिसांनी मंगळवारी आरोपी विरोधात घाटकोपर पोलिसांनी कलम ३७६, ३७६ (२) (I), ३७७, ५०६ भादवि सह ४, ६, १२ बालकांचे लैगिंक अपरधापासून संरक्षण (पॉक्सो ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली. दरम्यान राजावाडी रुग्णालयात पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com