लातुर - आज सकाळी लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने चक्क चुलत जावयाला रॉडने मारहाण केली आणि यात जावाईचा जागेच मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर सासऱ्याने स्वतः लॉजचा तिसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास आत्महत्या केली आहे. याबाबत विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे देखील पहा -
आंबूलगा येथील 45 वर्षीय शिवाजी दगडू शिंदे यांनी लातुर शहरातील नवीन रेणापूर नाक्याजवळ साईधाम नावाचे लॉज चालवन्यासाठी घेतले होते. त्याच्या भावाच्या मुलीचा कातपुर येथील 37 वर्षीय उमेश देशमुख याच्याशी विवाह झाला होता. तो सतत पत्नीला त्रास देत होता यामुळे त्याच्यात सतत वाद होत असे, काल रात्रीला जावई उमेश देशमुख आणि चुलत सासरे शिवाजी शिंदे यांच्यात लॉजवर वाद झाला.
दरम्यान खिडकीला पडदे अडकवण्याच्या रॉडने चुलत जावयाला मारहाण केली त्यात चुलत जावई उमेशचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सासरा शिवाजी शिंदे यांनी तिसऱ्या मजल्यावर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी दिली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.