चंद्रपूर: विदेशामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा नागपूर (Nagpur) येथील भूखंड तोतया व्यक्ती आणि बोगस कागदपत्रे (Documents) तयार करुन गहाण ठेवल्याप्रकरणी चंद्रपूर (Chandrapur) येथील कन्यका नागरी सहकारी बॅंकेच्या ६ संचालकांबरोबरच एकूण १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये बँकेचे (bank) माजी अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल भास्कवार आणि बँक संचालक असलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार (MLA) किशोर जोरगेवार यांचा देखील समावेश आहे. इलेक्ट्रिक अभियंता असलेले मनोहर कऱ्हाळे हे मूळचे नागपूरचे असून, त्यांच्या मालकीचा खामला परिसरात भूखंड होता. (Crime filed against 16 directors Kanyaka Bank Chandrapur)
हे देखील पहा-
१९६५ ला नोकरीनिमित्त ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. मात्र, जून २०२० ला कन्यका नागरी सहकारी बँकेच्या नागपूर येथील सीताबर्डी शाखेने मनोहर कऱ्हाडे यांचा भूखंड लिलावास काढला होता. यानंतर बजाजनगर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलीस तपासात मुख्य आरोपी असलेल्या स्वप्निल भोंगाडे याने बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि पदाधिकाऱ्यांशी संगनमत करत मनोहर कऱ्हाडे नावाची तोतया व्यक्ती उभी करून तो भूखंड गहाण ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे.
या भूखंडावर १ कोटी २५ लाखांची उचल करण्यात आली. मात्र, कन्यका बँकेने हे सर्व आरोप फेटाळले आहे. त्यांच्या मते सरकारी यंत्रणेने कर्जाबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर कर्जाची रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेने याप्रकरणात कुठलाच गैरव्यवहार केलेला नाही.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.