BJP ला राेखण्यासाठी माकप 'मविआ' शी करणार हात मिळवणी; नरसय्या आडमांचे संकेत

भारतीय जनता पक्षाने महापालिकेचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप माकपचे नेते माजी आमदार नरसाय्या आडम यांनी केला.
narasaya adam
narasaya adamsaam tv
Published On

सोलापूर : सोलापूर महापालिकेत (solapur muncipal corporation) भाजपला (bjp) राेखण्यासाठी माकपने महाविकास आघाडी (mva) साेबत निवडणुक (election) लढण्याचे संकेत दिले आहेत. माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम (narasaya adam) यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. (narasaya adam latest marathi news)

माजी आमदार नरसय्या आडम म्हणाले वरिष्ठ स्तरावर निवडणुकीबाबत चर्चा करुन आम्ही महाविकास साेबत जाण्याचे ठरवले आहे. भारतीय जनता पक्षाने महापालिकेचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोपही त्यांनी केला.

narasaya adam
Anand Remake: आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..; रुपेरी पडद्यावर पुन्हा येताेय 'आनंद'

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांच्या समवेत चर्चा झाली असून माकपने काही मुद्यांवर मविआ साेबत आघाडी करण्याचा अथवा मविआला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे आडम यांनी स्पष्ट केले.

narasaya adam
Solapur: सोलापूर विद्यापीठ ऑफलाइन पद्धतीने घेणार परीक्षा; जाणून घ्या तारीख

आमची आघाडी झाली नाही तर आम्ही महापालिकेच्या ४० जागांवर लढू असेही आडम यांनी स्पष्ट करीत माकप किमान २२ जागा पटकावेल असा दावाही केला. दरम्यान मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण टिकवले मात्र महाराष्ट्र सरकारला ते का जमले नाही या प्रश्नावर आडम म्हणाले ओबीसी आरक्षण टिकवण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कुठेतरी कमी पडली आहे. त्यांचे काहीतरी चुकले आहे असे आडम यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

narasaya adam
मला सत्तेचे काही घेणं देणं नाही; 'मविआ' च्या निर्णयावर आमदार प्रणिती शिंदे भडकल्या
narasaya adam
Mahableshwar: शालेय पोषण आहारात मुलांना मिळणार मध
narasaya adam
OBC Reservation: ओबीसींना दिलासा; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मिळाले आरक्षण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com