Corona Update: देशात कोरोना फोफावला, वाढत्या रुग्ण संख्येनं महाराष्ट्राची चिंता वाढली

Corona Virus Update: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढत आहेत. आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आले आहे. केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत.
Corona Update: देशात कोरोना फोफावला, वाढत्या रुग्ण संख्येनं महाराष्ट्राची चिंता वाढली
Published On

अख्या जगाला धडकी भरवणारा कोरोना आजाराने पुन्हा एकदा डोके काढले आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण आढळून लागलेत. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आलीय. देशातील एकूण कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या 1009 वर पोहोचलीय.

केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत. यातील सात जाणांचा मृत्यू देखील झालाय. परंतु ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाला की इतर कोणत्या आजाराने झालाय त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. या रुग्णाच्या मृत्यूचं कारण तपासलं जातंय.

Corona Update: देशात कोरोना फोफावला, वाढत्या रुग्ण संख्येनं महाराष्ट्राची चिंता वाढली
New COVID: कोरोनाचा नवा उपप्रकार अधिक संसर्गजन्य, NB.1.8.1 मुळे वाढलं टेन्शन, काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन

भारतामध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांचा आकडा 1,000 वर पोहोचलाय. 752 प्रकरणाची पुष्टी आरोग्य विभागाकडून करण्यात आलीय. दरम्यान देशातून सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमधील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 430 वर पोहोचलाय. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 209 आहे.

दिल्लीमध्ये 104 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आढळून आलेत. तर कर्नाटकात 47 आणि पश्चिम बंगालमध्ये 11 कोरोनाचे रुग्ण आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 7 संशयित कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. यातील महाराष्ट्रातील 4, केरळमधील 2 तर कर्नाटकमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. मात्र या रुग्णांचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाला की अन्य काही कारणांमुळे याची पुष्टी अद्याप आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाहीये.

मृत्यूचं कारण तपासलं जातंय, या रुग्णांना इतर काही आजार देखील होते, अशी माहितीही मिळालीय. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ होऊ लागलीय. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आले आहे. प्रत्येक राज्याच्या आरोग्य विभागाला या पार्श्वभूमीवर तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तसेच रुग्णालयांना देखील आदेश देण्यात आलेत. जर एखादा संशयित रुग्ण आढळून आल्यास त्याची कोरोना चाचणी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com