भारतात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. विविध राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोनाच्या उपप्रकारानं आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलंय.
गेल्या काही आठवड्यांपासून, भारतात अनुक्रमित केलेले SARS-Cov-2 चे नमुने BA.2 आणि JN.1 प्रकारांचे होते. मात्र NB.1.8.1 नावाचा एक नवीन उप-प्रकार भारतात आढळून आला आहे. एप्रिलमध्ये या नमुन्याचे संकलन आणि निर्धारण करण्यात आले होते. तामीळनाडूतील इन्साकॉग लॅबमध्ये एक नमुना सादर करण्यात आला आहे.
कोरोनाचं हे नवं रूप किती त्रासदायक आहे, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे. 'NB.1.8.1 ' हा उपप्रकार सध्या देखरेखीखाली असल्याचे जाहीर केले आहे. या उपप्रकाराचे गुणधर्म 'एसएआर-सीओव्ही-2'विषाणूच्या गुणधमपिक्षा बरेचसे भिन्न आहेत. मात्र, त्याचे रूपांतर महासाथीत होऊ शकते का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. NB.1.8.1 हा पूर्वीच्या उपप्रकारांपेक्षा अधिक गंभीर आजारास कारणीभूत होण्याचे लक्षण आतापर्यंत आढळलेले नाही. मात्र, तो मानवी पेशींना अधिक जलद चिकटतो, त्यामुळे तो अधिक संसर्गजन्य होतो. त्यामुळे त्याचे संक्रमण अधिक सहज होते, असं वैद्यकीय तज्ञ सांगतात. 18 मेपर्यंत 22 देशांमधून या प्रकाराचे 518 नमुने सादर करण्यात आले आहेत. सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड, अमेरीका, जपान, दक्षिण कोरिया आणि इतर देशांमध्ये आढळून आला आहे.
सध्या कोविड-19विरुद्ध असलेल्या प्रतिकारशक्तीचा NB.1.8.1 वर कमी परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळेच सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शक सुचनांचं तंतोतंत पालन करणे सगळ्याचं हिताचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.