Corona काळात नोकरी गेल्याने करु लागला चोऱ्या, आरोपीकडून जप्त केल्या तब्बल 20 गाड्या

कोरोनाच्या काळात या युवकाची बँकेच्या रिकव्हरीची नोकरी गेल्याने हा युवक थेट दुचाकी चोऱ्या करायला लागला.
Theft
Theftतबरेज शेख
Published On

तबरेज शेख -

नाशिक - कोरोनाच्या काळात अनेक नागरीकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या त्यामुळे काही युवक नैराश्याने पैशाच्या आर्थिक अडचणीमुळे गुन्हेगारीकडे वळू लागले आहेत यात प्रामुख्याने दुचाकी चोरीच्या घटना शहरात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशाच एका दुचाकींची चोरी करणाऱ्या युवकाला नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी (Nashik Gangapur Police) ताब्यात घेतला आहे. नाशिकचा (Nashik) गंगापूर पोलिसांनी राहुल शेवाळे या युवकाकडून जप्त अनेक दुचाकी जप्त केल्या आहेत.

नोकरी गेल्याने केली चारी -

Theft
SambhajiRaje: संभाजी राजांना पाठींबा देण्यासाठी १२ वर्षीय मुलाने अडवला राऊतांचा ताफा

कोरोनाच्या (Corona) काळात या युवकाची बँकेच्या रिकव्हरीची नोकरी गेल्याने हा युवक थेट दुचाकी चोर झाला अवघ्या पाच ते सहा हजारात हा युवक नाशिक शहरासह ग्रामीण भागामधील दुचाकी विकत होता या दुचाकी चोर पकडून पोलिसांनी 20 दुचाकीसह सहा लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये रोजच एक ते दोन दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी अशा दुचाकी (Two-wheeler) चोरांना पकडण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे.

दोन दिवसापूर्वीच नाशिक भद्रकाली पोलिसांनी (Nashik Bhadrakali Police) एका रिक्षा चोराला पोलिसांनी अटक केली होती तर आज पुन्हा एकदा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक केली असून त्याच्याकडून अजून दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे याबाबत अधिक तपास गंगापूर पोलिस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com