SambhajiRaje: संभाजी राजांना पाठींबा देण्यासाठी १२ वर्षीय मुलाने अडवला राऊतांचा ताफा

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा ताफा अडवला.
Maratha Reservation
Maratha Reservationसंजय जाधव
Published On

बुलढाणा : खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) बेमुदत उपोषणास बसले आहेत. दरम्यान काल रात्रीपासून त्यांची तब्येत खालावली असल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.

अशातच आज शेगाव येथील शिवाजी चौकात एका १२ वर्षीय मराठा मुलाने उर्जामंत्री नितीन राऊतांचा (Nitin Raut) ताफा अडवला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचा ताफा अडवला.

Maratha Reservation
भाजप नगरसेवकाच्या कार्यालय तोडफोडीनंतर; काँग्रेस-भाजप आमने सामने

दरम्यान हा ताफा अडवून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं याबाबतचं नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आलं आहे. राऊत दोन दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर असून हा ताफा अडविल्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक बघायला मिळाली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com