कोरोनात श्रीमंतीची व्याख्या जाणवली - सयाजी शिंदे

कोरोनाच्या काळात करोडोंची संपत्ती असणारे देखील ऑक्सिजनसाठी झगडताना आपण पहिले आहेत. त्यामुळे झाडाखाली बसल्यानंतर मोफत ऑक्सिजन मिळणे म्हणजे खरी श्रीमंती आहे.
कोरोनात श्रीमंतीची व्याख्या जाणवली - सयाजी शिंदे
कोरोनात श्रीमंतीची व्याख्या जाणवली - सयाजी शिंदेविजय पाटील

विजय पाटील

सांगली - कोरोनाने श्रीमंतीची व्याख्या जाणवून दिली आहे. बंगला, गाडी आणि विमानाने फिरणे याला श्रीमंती म्हणत नाहीत. कोरोनाच्या काळात करोडोंची संपत्ती असणारे देखील ऑक्सिजनसाठी झगडताना आपण पहिले आहेत.Corona felt the definition of wealth - Sayaji Shinde

त्यामुळे झाडाखाली बसल्यानंतर मोफत ऑक्सिजन मिळणे म्हणजे खरी श्रीमंती आहे. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणाचे महत्व ओळखून झाडे लावून त्यांना जगवणे आत्यंतिक महत्वाचे आहे. असे मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ते सांगलीच्या अग्रनी-धुळगाव येथे बोलत होते.

सांगली जिल्ह्यातील अग्रनी-धुळगाव येथे महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि 25 एकराच्या भव्य पटांगणावर उभारण्यात आलेल्या जैवविविधता प्रकल्पाचा शुभारंभ सह्यादी देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे आणि सिने अभिनेते सागर कारंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभिनेता सयाजी शिंदे यांनी निसर्गाचे व झाडांचे महत्व पटवून देत गावात वृक्ष बँक तयार करा असा सल्ला देखील दिला.

कोरोनात श्रीमंतीची व्याख्या जाणवली - सयाजी शिंदे
एक पाय नसूनही तो दररोज करतो योगसाधना

यावेळी अभिनेते सागर कारंडे म्हणाले झाडे लावा आणि ऑक्सिजन मिळावा हा सयाजी शिंदेंनी दिलेला संदेश वास्तविकतः खूप मोठ्या आशयाचा संदेश असून काळाची पावले ओळखत वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन करणे हे भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. अनेक जण विविध ठिकाणी, विविध प्रसंगी फोटो काढतात पण झाडे लावून फोटो काढणे याला जगणे म्हणतात असे देखील सागर कारंडे म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com