एक पाय नसूनही तो दररोज करतो योगसाधना

लहानपणापासून योग आणि व्यायामाची आवड असणाऱ्या आकाशने अपघातानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत पुन्हा योगसाधना सुरु केली आहे, हि निश्चितच प्रेरणादायी गोष्ट आहे.
एक पाय नसूनही तो दररोज करतो योगसाधना
एक पाय नसूनही तो दररोज करतो योगसाधनामंगेश कचरे

मंगेश कचरे

बारामती : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने आपण अनेक सिलेब्रिटीज चे योग करतानाचे फोटो काल पहिले असतील. मात्र बारामतीमधील आकाश बागव या युवक एक पायावरतीच योगाभ्यास करतो. सूर्यनमस्कार करताना सदृढ व्यक्तीला देखील तोल सांभाळत सर्व सूर्यनमस्कार करावे लागतात. दोन पाय असून देखील आपली दमछाक होईल मात्र आकाशने हे सर्व सरावाने सहजसाध्य केलं आहे. Even without one leg, he does yoga every day

हे देखील पहा -

18 वर्ष वय असणारा आकाश हा मूळचा फलटण तालुक्यातील गोखळी गावाचा रहिवासी आहे. एक पाय गमावून देखील तो नियमितपणे आपले योगाचे प्रकार करतो ते करतांना आपल्याला एक पाय नाही असं त्याला कधी वाटतंच नाही.

डिसेंबर 2020 मध्ये एका अपघातात आकाशाला त्याचा पाय गमवावा लागला. मात्र जिद्दीच्या जोरावर अन मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता आकाश पुन्हा एका पायावर उभा राहिलाय आणि योग करण्यासोबतच तो घरची इतर काम देखील करतोय.

एक पाय नसूनही तो दररोज करतो योगसाधना
वाचा | योग दिन हा एकात्मतेचा दिवस -पंतप्रधान नरेंद्र मोदी

अपघातात एक पाय गमावलेल्या आकाशची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आई-वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. आकाशच्या अडचणीच्या काळात त्याच्या मित्रांनी त्याला मोठ्या प्रमाणात मदत केल्याचे तो सांगतो आणि या सर्व घटनेनंतर हतबल झालेल्या आकाशला जीवनात नव्या जोमाने आणि जिद्दीने जीवन जगण्यासाठी मित्रांची मोठी साथ मिळतेय असं देखील आकाश नमूद करतो.

सर्व सामान्य युवकाप्रमाणे जीवन जगत असणाऱ्या आकाशला दुर्दैवाने एका पाय गमवावा लागला. मात्र ओढवलेल्या परिस्थितीने आकाश रडत बसला नाही. तर जिद्दीने आणि इच्छाशक्तीने तो इतरांनाही प्रेरणा देणायचे काम करतोय. त्याला पुढे जाऊन उत्तम खेळाडू बनायचं असल्याचे तो सांगतो.

लहानपणापासून योग आणि व्यायामाची आवड असणाऱ्या आकाशने अपघातानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत पुन्हा योगसाधना सुरु केली आहे, हि निश्चितच प्रेरणादायी गोष्ट आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com