मुंबई : रेल्वे २१ तास उशिरा आल्यामुळे ग्राहक मंचाने थेट रेल्वेलाच २० हजार रूपयांचा दंड केल्याचं समोर आलंय. रेल्वे २१ तास उशिरा पोहोचली, म्हणून प्रवाशाने जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली. तेव्हा ग्राहक मंचाने त्याला २० हजार रूपयांचा दंड ठोठावल्याचं समोर आलंय. हे नेमकं काय प्रकरण आहे, ते आपण सविस्तर पाहू या.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने मागील वर्षी वाशीमहून जम्मूला जाण्याचे नियोजन केलं होतं. यासाठी त्याने हमसफर ट्रेनची तिकिटे बुक केली (What Is Compensation For delayed Train) होती. जाण्याच्या तिकीटांसोबतच त्याने परतीच्या प्रवासाचे देखील नियोजन केले होते. परत येण्यासाठी रिटर्न तिकीट देखील बुक केलेले होते.
ही ट्रेन २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी दीड वाजता निघणार (Consumer Forum) होती. त्यानंतर २८ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी जम्मूला पोहोचणार होती. परंतुवाशीमला ही ट्रेन सात तास उशिरा पोहोचली. त्यानंतर १४ तास उशिराने जम्मूला पोहोचली. म्हणजेच ही ट्रेन २१ तास लेट झाली (Indian Railway) होती. त्यामुळे या व्यक्तीला वाशिम स्थानकावर सात तास वाट पहावी लागली.
जम्मू येथेही पोहोचण्यास देखील उशीर झाला. त्यामुळे या व्यक्तीची प्रवासाची योजना फसली, असं तक्रारीमध्ये म्हटलंय. नियोजनाप्रमाणे जम्मूमध्ये प्रवास करता आला नाही, अशी तक्रार त्याने (Compensation For delayed Train) केली. वाशिममधील जिल्हा आयोगाने या याचिकेवर विशेष निर्णय घेतलाय. कारण रेल्वेने जिल्हा आयोगाने नोटीसला प्रतिसाद दिला नव्हता. यामुळेच आदेशात जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने भारतीय रेल्वेला २१ तासांच्या उशीराची भरपाई म्हणून प्रवाशाला २० हजार रुपये देण्याचे निर्देश दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.