Amit Deshmukh : अमित देशमुखांकडे महाराष्ट्राचं नेतृत्व द्या, भरसभेत काही आमदारांची काँग्रेसच्या वरिष्ठांना मागणी

Amit Deshmukh Latest News : नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोरच ही मागणी केली आहे. त्यामुळे अमित देशमुख यांना काँग्रेस पक्षाची राज्याची जबाबदारी देऊन अमित देशमुख यांची नाराजी दूर करणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
Amit Deshmukh
Amit Deshmukh Saam tv
Published On

संदिप भोसले, लातूर

Amit Deshmukh Latest News :

अशोक चव्हाण यांच्यानंतर अमित देशमुख यांची भाजप प्रवेशाची चर्चा सर्वत्र सुरू होती. भाजप प्रवेशाची चर्चा सुरु असताना काँग्रेसच्या काही आमदारांनी अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची मागणी केली आहे. या आमदारांनी चक्क काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोरच ही मागणी केली आहे. त्यामुळे अमित देशमुख यांना काँग्रेस पक्षाची राज्याची जबाबदारी देऊन अमित देशमुख यांची नाराजी दूर करणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. (Latest Marathi News)

आज लातूरमध्ये विकास सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच अनावरण करण्यात आलं. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात,आमदार विश्वजीत कदम, आमदार सतेज पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जयंत पाटील उपस्थित होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कार्यक्रमातील भाषणावेळी आमदार विश्वजीत कदम आणि आमदार सतेज पाटील या दोन्ही नेत्यांनी अमित देशमुख यांना आता लातूर पुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्रात पुढे येऊन नेतृत्व करण्याची मागणी केली होती. तर त्यांच्या या मागणीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , तसेच पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी देखील भाषण करताना अमित देशमुख यांनी लातूर पुरतं मर्यादित न राहता समोर येऊन राज्यात काँग्रेसचे नेतृत्व करावं, असं बोलत त्यांच्या मागणीला संमती दिली.

तत्पूर्वी, अमित देशमुख हे भाजप प्रवेशाच्या वाटेवर असल्याची चर्चा असल्याने त्यांना काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी देऊन काँग्रेस पक्ष अमित देशमुख यांची नाराजी असल्याची चर्चा दूर करणार का, हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com