Rashmi Barve : काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना मोठा धक्का; जात वैधता प्रमाणपत्र रद्द प्रकरणी दिलासा नाहीच!

Rashmi Barve caste validity : आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगितीने दिली आहे. कोर्टाच्या निर्णयाने ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रश्मी बर्वेंना मोठा धक्का बसला आहे.
Congress Rashmi Barve News
Congress Rashmi Barve NewsSaam TV

पराग ढोबळे, नागपूर

Rashmi Barve latest news :

नागपूरमधील रामटेकमधील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या उमेदवारी रद्द केली होती. त्यानंतर जात पडताळणी समितीनेही त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलंय. त्यानंतर त्यांनी कोर्टातही धाव घेतली होती. आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगितीने दिली आहे. कोर्टाच्या निर्णयाने ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रश्मी बर्वेंना मोठा धक्का बसला आहे.

उमेदवारी अर्जाची छाननीत रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुनावणी घेतली होती. त्यांनी याचिकाकर्ते सुनील साळवे आणि रश्मी बर्वे यांच्या बाजू ऐकून घेतली. त्यानंतर जात वैधता समितीच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याने बर्वे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. पुढे बर्वे यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टात बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

Congress Rashmi Barve News
Thackeray Shivsainik Clash: संगमनेरमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, लोकसभा उमेदवारासमोरच भिडले शिवसैनिक

तसेच रश्मी बर्वे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून दाखल केलेला अर्ज रद्द केल्याप्रकरणी न्यायालयाने कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

याप्रकरणी नागपूर खंडपीठात पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होईल, विशेष म्हणजे तोपर्यंत रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीचा मतदान पार पडलेला असेल. त्यामुळे रश्मी बर्वे यांना जात आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी दिलासा मिळाला असला तरी त्यांची उमेदवारी रद्द केल्याप्रकरणी दिलासा मिळालेला नाही.

रश्मी बर्वे यांचे वकील अॅड. शैलेश नारनवरे यांनी काय म्हटलं?

अॅड. शैलेश नारनवरे यांनी म्हटलं की, काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. मात्र, जात पडताळणी समितीच्या रश्मी बर्वे यांचा जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला. जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांना पुरेशी संधी दिली नाही, या तक्रारीबाबत जात पडताळणी समितीने पुन्हा रश्मी बर्वे यांचे म्हणणे ऐकून घ्यावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहे'.

Congress Rashmi Barve News
Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीत पोलीस ॲक्शन मोडवर, कल्याण डोंबिवलीत 773 जणांचे रिव्हॉल्वर केले जप्त

'रश्मी बर्वे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी न्यायालयाने कुठल्याही दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रामटेकमधून निवडणूक लढू देण्याची मागणी एका प्रकारे फेटाळली गेली आहे. या प्रकरणी नागपूर खंडपीठात पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होईल. विशेष म्हणजे तोपर्यंत रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीचा मतदान पार पडलेल असेल, असेही अॅड नारनवरे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com