Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी केव्हा जाहीर होणार? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

balasaheb thorat on Lok Sabha Election : राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी आज शुक्रवारी सायंकाळी जाहीर होईल, अशी माहिती काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
Congress Political News
Congress Political NewsSaam tv
Published On

सुनील काळे, मुंबई

balasaheb thorat News :

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. काँग्रेसने उमेदवारांची काल रात्री तिसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा सामावेश होता. त्यानंतर राज्यात काँग्रेसकडून इतर लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळते, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याचदरम्यान, राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी आज शुक्रवारी सायंकाळी जाहीर होईल, अशी माहिती काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेब थोरात म्हणाले, 'राज्यातील पहिली यादी काल आली. दुसरी यादी आज शुक्रवारी संध्याकाळी येईल. उर्वरित जागांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. तीन ते चार जागांचा विषय आहे. सांगलीबाबतची वस्तुस्थिती आम्ही दिल्लीला सांगितली आहे'.

Congress Political News
Arvind Kejriwal News: ब्रेकिंग! दिल्ली CM अरविंद केजरीवालांना कोठडीतच राहावं लागण्याची शक्यता; सुनावणीत काय घडलं?

'आम्ही मुंबईच्या तीन जागा मागितल्या आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या आमच्याकडे जास्त आहे,असे ते पुढे म्हणाले.

प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसची खाती गोठवली आहे. या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले, 'प्रचार साहित्य, जाहीरनामा ही सर्व लोकशाहीची खरी तयारी असते. पण आता भाजपची तयारी वेगळी आहे. कोणाकडे ईडी पाठवायची, सीबीआय कुठे पाठवायची...कोणाची खाती गोठवायची ही तयारी भाजपची सुरू आहे. त्यात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकणं हे किती योग्य आहे'.

Congress Political News
Iqbal Singh Chahal : मोठी बातमी! इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

सिल्व्हर ओक बैठकविषयी म्हणाले, ' या बैठकीची बातमी येतेच कुठून? या बैठकीतील चकमकीचा आवाज तुम्हाला बाहेर आला का? त्यांना कोल्हापूरला जायचं होतं म्हणून ते लवकर निघाले, चर्चेतून मार्ग आम्ही काढतोय'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com