Vijay wadettiwar: 'काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना तुरुंगात टाकू'

Vijay wadettiwar News: राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज राज्य सरकार आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.
Vijay wadettiwar
Vijay wadettiwarSaam tv
Published On

Vijay Wadettiwar News:

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज राज्य सरकार आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. वडेट्टीवार यांनी चंद्रपूरच्या चिमूर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाना पटोले आणि वडेट्टीवार एकाच मंचावर बघायला मिळाले. या दोघात नेहमीच राजकीय विसंवाद बघायला मिळाला. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते आज एकत्र आल्याने कार्यकर्त्यात उत्साह दिसून आला.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुकर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर येथे या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. यानंतर जाहीर सभा झाली. या सभेला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vijay wadettiwar
Pradeep Kurulkar: डॉ. प्रदीप कुरुलकरांच्या पॉलिग्राफ आणि व्हाइस लेयर चाचणीचा अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला

विजय वडेट्टीवार म्हणाले, 'महाराष्ट्राचे सरकार हे ३ रिमोटने चाललं आहे, असं म्हणत राज्याच्या तिजोरीची लूट चालली आहे. फक्त सत्ताधारी आमदारांचा विकास सुरू आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सोबतच त्यांनी काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना जेलमध्ये टाकू आणि चक्की पिसायला लावू, असा इशारा दिला.

मंत्रिमंडळ बैठक व घोषणा म्हणजे शिळ्या कढीला उत : विजय वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट बैठकीवर टीका केली आहे. राज्य सरकारची मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक व घोषणा म्हणजे शिळ्या कढीला उत म्हणात टीका केली आहे.

'2016 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेल्या 42 हजार कोटींच्या घोषणेच्या अंमलबजावणीचे काय झाले, असा सवाल त्यांनी विचारला. त्याच त्याच प्रकल्पांसाठी पुन्हा पुन्हा पैसे दिले जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच केवळ लोकांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठीच बैठक असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Vijay wadettiwar
OBC Reservation: 'ओबीसी आरक्षणात वाटेकरी येऊ देणार नाही', उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com