Politics: हनी ट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं, बड्या नेत्यांचा समावेश; काँग्रेसच्या नेत्यानं उघडले पत्ते

CD Leak Behind Power Shift Honey Trap: विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे की शिंदे सरकार हनी ट्रॅप आणि सीडी प्रकरणामुळे सत्तेत आले. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Congress Leader Vijay Wadettiwar
Congress Leader Vijay WadettiwarSaam Tv News
Published On

महाविकास आघाडीचे सरकार उलथवून सत्तेवर आलेलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच स्थापन झालं, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे आरोप फेटाळून लावले, पण सरकार आणि विरोधकांकडे याविषयी माहिती आहे', असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

प्रसारमाध्यामांशी बोलताना विजय वडेट्टीवार हनी ट्रॅपसंदर्भात गौप्यस्फोट केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, 'काल हनी नाही आणि ट्रॅपही नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण याबाबत मोठी माहिती सरकार आणि विरोधकांकडे आहे. कुणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण शिंदेंचं जे सरकार आलं, जी काही सत्तापालट झाली, ती सीडीमुळे झाली. एवढं मोठं ते प्रकरण आहे', असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Congress Leader Vijay Wadettiwar
Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? २४ कॅरेट सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा लेटेस्ट दर

'जे काही अधिकारी आहेत. आजी - माजी मंत्री आहेत. यात खूप बड्या व्यक्तींचा समावेश आहे. यावर अधिक बोलण्याची गरज नाही. जेव्हा दाखवू तेव्हा तिकीटच लावावं लागेल. तिकीट लावूनच चित्र दाखवावं लागेल', असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. वडेट्टीवारांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

Congress Leader Vijay Wadettiwar
Politics: भाजप गुन्हेगारांचे आश्रयस्थान, पक्षात जाऊन आमदार-मंत्री व्हायचं, ठाकरेंच्या खासदाराची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com