Sunil Kedar News : काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का? न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Court on Sunil Kedar News : सुनील केदार यांना जामीन मिळणार का? शिक्षेच्या स्थगितीबाबत न्यायाधीश काय निर्णय देतात यावर लक्ष आहे. सुनील केदार यांची प्रकृती बिघडल्याने ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
sunil kedar News
sunil kedar Newssaam tv
Published On

पराग ढोबळे

Nagpur News :

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना ५ वर्षांचा शिक्षा न्यायालयाने दिल आहे. या शिक्षेनंतर त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एस पाटील यांच्या समक्ष दोन्ही बाजूने जामीन आणि शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी युक्तिवाद झाला.

सरकारी वकील आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर त्यावर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज काय निकला येतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुनील केदार यांना जामीन मिळणार का? शिक्षेच्या स्थगितीबाबत न्यायाधीश काय निर्णय देतात यावर लक्ष आहे.

sunil kedar News
Farmer March in Pune : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी आक्रमक, 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ला आजपासून प्रारंभ

सुनील केदार यांची अँजिओग्राफी होण्याची शक्यता?

काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना बँक रोखे घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने शुक्रवार रात्रीपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना छातीत दुखण्याचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना अँजिओग्राफीचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांना ताप आणि खोकला असल्यामुळे चाचण्या लांबल्या होत्या.  (Latest News)

sunil kedar News
Khaire vs Danve News: अंबादास दानवेंना लोकसभेत काय करायचं? चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

तसेच सिटीस्कॅनचे रिपोर्ट्स नॉर्मल आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातं आहे. यासह कोरोना टेस्ट आणि स्वाइन फ्लूची टेस्टसुद्धा निगेटिव्ह आली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र किडनीच्या त्रासामुळे क्रिएटिन लेव्हल अजूनही वाढलेली आहे. त्यामुळे आज अँजिओग्राफी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com