(अक्षय गवळी, अकोला)
आज काँग्रेसने ७ लोकसभा उमेदवारांच्या नावे जाहीर केली तसेच अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूकीसाठी उमेदवार जाहीर केलाय. अकोला महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेता साजिद खान पठाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिलीय. साजिद खान पठाण हे आता काँग्रेसचे अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत अधिकृत उमेदवार असणार आहेत. (Latest News)
दरम्यान अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजचं शिवसेना ठाकरे गटाचा मावळत्या महापालिकेतील शिवसेना गटनेते राजेश मिश्रांची नावाची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे आता अकोल्यात महाविकास आघाडीत आता बिघाडी होण्याची शक्यता आहे. २६ एप्रिलला लोकसभेसोबतच अकोला पश्चिम विधानसभेसाठी पोटनिवडणूक होतीये. भाजप आमदार गोवर्धन शर्मां यांच्या निधनामुळे येथे विधानसभेची जागा रिक्त झालीय. १९९५ ते २०२३ निधनापर्यंत सलग सहावेळा गोवर्धन शर्मांनी अकोला पश्चिम मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतंय.
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अकोला पश्चिम विधान सभाची पोटनिवडणूक होत आहे. एकीकडे भाजपमध्ये या पोटनिवडणुकीच्या जागेच्या उमेदवारीवरून अंतर्गत कलह सुरू आहेत. त्याच दरम्यान काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. अकोला महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेता साजिद खान पठाण हे आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. आता भाजप कोणाला संधी देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान भाजपकडून दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबातील कृष्णा शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल याचा आणखी १६ जण शर्यतीत आहेत.
साजिद खान पठाण नेमके कोण आहेत?
सन २००७ च्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसवर नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती, तसेच अकोला महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी कामकाज केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली होती.
या निवडणुकीत निकालाच्या दिवशी सुरुवातीपासून काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पठाण यांनी भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा यांच्यावर आघाडी मिळविली होती. शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज साजीद खान यांनी शर्मा दिली होती. या दरम्यान ६७ हजार ६२९ हजार मते साजीद खान यांना मिळाली. तर भाजप उमेदवार शर्मा यांचा अवघ्या २ हजार ६२३ मतांनी निसटता विजय झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पराभूत होऊनही विजयी ठरल्याची भावना अकोलेकरांनी व्यक्त केल्या होत्या. दरम्यान सहाव्यादा अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघावर दणदणीत विजयश्री प्राप्त करणाऱ्या गोवर्धन शर्मा यांना २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने कडवी झुंज दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.