औरंगाबादमध्ये परीक्षा केंद्रावर सावळागोंधळ; एकाच बाकावर तीन-तीन विद्यार्थी

दोन वर्षानंतर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेतल्याने विद्यापीठाच्या नियोजनात अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.
Aurangabad Exam
Aurangabad Exam Saam Tv
Published On

औरंगाबाद: मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे (Corona) देशात ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आल्या. आता काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने न घेता ऑफलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण दोन वर्षानंतर परीक्षा (Exam) घेतल्याने विद्यापीठाच्या नियोजनात अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाचा असाच परीक्षेदरम्यानचा गोंधळ समोर आला आहे.

आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. पदवीच्या बीएससी (B.sc) बीसीएस (BCS) पेपरच्या ऐनवेळी विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंनी वाढली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

तसेच परीक्षा (Exam) केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला आल्यामुळे एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ परीक्षा केंद्र संचालकांवर आली. या गोंधळाची माहिती विद्यापीठ प्रशासनाला मिळताच परीक्षा विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा पथकासह परीक्षा केंद्रावर दाखल झाले आणि परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

Aurangabad Exam
कोरोनाने टेन्शन वाढवलं! टास्क फोर्सची बोलावली बैठक; काय होणार निर्णय

९ वाजता होणार पेपर झाला १२ वाजता सुरू

आज होणाऱ्या पेपरची वेळ सकाळी ९ होती पण हा पेपर १२ वाजले तरीही सुरू झालाच नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी (Student) नाराजी व्यक्त केली. यावर विद्यापीठ प्रशासनाने यावर लवकरात लवकर मार्ग काढू तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.

Aurangabad Exam
Hardik Patel joins BJP: हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश; म्हणाले, मी नरेंद्र मोदींचा शिपाई

तिन्ही पेपर वेगळे

आज सकाळी परीक्षेसाठी (Exam) विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून एका बाकावर तीन विद्यार्थी बसविण्यात आले आहे. पण तिनही विद्यार्थ्यांचा पेपर हा वेगळा होता. त्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.सतीश सुराणा यांनी दिली.

परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय

ज्या परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला ते परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजयेंद्र काबरा महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची परीक्षा शहरातील इतर दोन महाविद्यालयात घेतली जाणार आहे. परीक्षेच्या गोंधळ प्रकरणी विद्यापीठ परीक्षा विभागाचे संचालक आणि केंद्र संचालकांना नोटीस देण्यात आली असल्याची माहिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरु श्याम शिरसाठ यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com