Hardik Patel joins BJP: हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश; म्हणाले, मी नरेंद्र मोदींचा शिपाई

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Hardik Patel joins BJP Latest News in Marathi
Hardik Patel joins BJP Latest News in MarathiSAAM TV
Published On

गांधीनगर: पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करून काँग्रेसला (Congress) रामराम करणारे गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी अखेर आज, गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरातमधील गांधीनगर येथील भाजपच्या (BJP) मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देशहित आणि राज्याच्या हिताची कामे करण्याबरोबरच आपल्या नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'छोटा शिपाई' आहे, असे ते म्हणाले. हार्दिक पटेल याच्यासह पाटीदार आंदोलनातील त्यांचे सहकारी आणि अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Hardik Patel joins BJP in Gandhinagar Gujarat after quit Congress)

Hardik Patel joins BJP Latest News in Marathi
Hardik Patel : हार्दिक पटेलचं भाजपमध्ये प्रवेश, निवडणुकीला उरले अवघे 6 महिने | SAAM TV

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेल यांनी घरी पूजा-अर्चा केली. ते म्हणाले की, 'ही माझ्यासाठी एक नवी सुरुवात असेल.' तत्पूर्वी आज सकाळीच हार्दिक पटेल यांनी ट्विट केला होता. देशहित, राज्याचे हित आणि समाजहिताच्या भावनेसह आज नव्या अध्यायाला सुरुवात करत आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भगीरथ कार्यात छोटासा शिपाई होऊन काम करेल, असे हार्दिक पटेल म्हणाले. हार्दिक पटेल हे गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचे प्रमुख चेहरा होते. काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला होता. मात्र अंतर्गत कलहामुळे त्यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देत असताना त्यांनी काँग्रेसच्या कार्यशैलीवर बोट ठेवलं होतं. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. ती चर्चा अखेर खरी ठरली आहे.

Hardik Patel joins BJP Latest News in Marathi
काँग्रेसचे बडे नेते विकले गेलेत; नेतृत्वावर गंभीर आरोप करत हार्दिक पटेल यांचा राजीनामा

हार्दिक पटेल यांनी मागील महिन्यात काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हार्दिक जवळपास तीन वर्षे काँग्रेसमध्ये होते. पक्षात दुर्लक्षित केल्याचा आरोप करतानाच, युवकांना संधी दिली जात नसल्याचे हार्दिक म्हणाले होते. १८ मे रोजी हार्दिक यांनी काँग्रेसला रामराम केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com