Bamboo Farming: बांबू लागवडीसाठी CM एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स, मराठवाडा, विदर्भाला मिळणार दिलासा

Bamboo Farming News: राज्यामध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन देवून त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित करण्यात आली आहे.
Bamboo Farming
Bamboo FarmingSaam Digital
Published On

Bamboo Farming

राज्यामध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन देवून त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित करण्यात आली आहे. २० जणांची ही समिती असून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बांबू लागवडीचा वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन करणार आहे. सरकारच्या या निर्यणामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना दुष्काळ आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटांना सामोरे लावं लागलं. बांबू हे पिक कमी पाणी वापरणारे तसेच जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणारे असल्यामुळे पर्यावरण स्नेही आहे. राज्यभरात बांबू लागवड केल्यास वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्याबरोबरच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला उदरनिवाहाचे साधन उपलब्ध होणार आहे. या टास्कफोर्सची बैठक तीन महिन्यातून किमान एकदा होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bamboo Farming
Mahanand Dairy: महानंद डेअरी खरंच गुजरातला जाणार का? चेअरमनने सांगितलं स्पष्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com