CM Eknath Shinde on Kolhapur Protest: 'कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही'; CM शिंदेंचा कडक इशारा

CM Eknath Shinde: कोल्हापुरातील या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesaam tv
Published On

Kolhapur News: कोल्हापुरात काही तरुणांनी आक्षेपार्ह व्हाट्सअॅप स्टेटस ठेवण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकारावरून कोल्हापुरात दोन गटांमधील वाद विकोपाला गेला आहे. कोल्हापुरात या वादानंतर एका गटाचं आंदोलन चिघळलं आहे. कोल्हापुरातील या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी या परिषदेत सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे. (Latest Marathi News)

कायदा हातात घेणाऱ्यांना पाठिशी घातलं जाणार नाही - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वाचं सहकार्य गरजेचं आहे. जे अधिकारी आहेत, त्यांच्याशी मी स्वत: वैयक्तिक बोलत आहे. सगळ्यांनी शांतता राखावी असं आवाहन करतो. मी अधिकाऱ्यांशी बोललो, तेव्हा सांगितलं की परिस्थिती नियंत्रणात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना पाठिशी घातलं जाणार नाही. मी स्वत: अधिकऱ्यांच्या संपर्कात आहे'.

CM Eknath Shinde
Kolhapur Bandh Update : कोल्हापुरातील लाठीचार्जवर नितेश राणे म्हणाले, पाेलिसांनी केलं ते... (पाहा व्हिडिओ)

देवेद्र फडणवीसांनी पोलिसांना दिल्या महत्वाच्या सूचना

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोल्हापुरातील परिस्थितीवर भाष्य केलं. 'देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' औरंगजेबाची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाहीच. पोलिस सुद्धा कारवाई करतच आहे. त्याचवेळी जनतेने सुद्धा शांतता पाळावी. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही. ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे'. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहविभागाला दिलेल्या आहेत.

आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी दोषींना अटक

कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेत दोषी असणाऱ्या काल दगडफेक करणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती केसरकर यांनी सांगितलं आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.

CM Eknath Shinde
Devendra Fadnavis News: औरंगजेबाची भलामण करणाऱ्यांना माफी नाही; देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाला महत्वाच्या सूचना

कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद

कोल्हापुरातील परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच कोल्हापुरात अफवा पसरू नये, यासाठी इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com