Devendra Fadnavis News: औरंगजेबाची भलामण करणाऱ्यांना माफी नाही; देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाला महत्वाच्या सूचना

'औरंगजेबाची भलामण करणाऱ्यांना माफी नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी गृहविभागाला महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSaam tv
Published On

रुपाली बडवे

Kolhapur News: कोल्हापुरात काही तरुणांनी आक्षेपार्ह व्हाट्सअॅप स्टेटस ठेवण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकारावरून कोल्हापुरात दोन गटांमधील वाद विकोपाला गेला आहे. कोल्हापुरात या वादानंतर मोठ्या संख्याने जमाव रस्त्यावर उतरल्याने एका गटाचं आंदोलन चिघळलं आहे. कोल्हापुरातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे.

'औरंगजेबाची भलामण करणाऱ्यांना माफी नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी गृहविभागाला महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. (Latest Marathi News)

आक्षेपार्ह व्हाट्सअॅप स्टेटसवरून शहरात एका गटाने मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाला गालबोट लागलं आहे. काही ठिकाणी दगडफेकीच्या देखील घटना घडल्या आहेत. अशा जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केला.

कोल्हापूरची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Maharashtra Latest News)

Devendra Fadnavis News
Kolhapur Protest News: कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन चिघळलं; पोलिसांचा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' औरंगजेबाची भलामण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाहीच. पोलिस सुद्धा कारवाई करतच आहे. त्याचवेळी जनतेने सुद्धा शांतता पाळावी. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही. ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे'. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहविभागाला दिलेल्या आहेत.

Devendra Fadnavis News
Shree Ganesh Sahakari Sakhar Karkhana Election News : 'गणेश' च्या निवडणुकीत कोल्हेंच्या भूमिकेमुळे विखेंची अडचण वाढली; थाेरात गटात चैतन्य

कोल्हापुरात नेमकं काय घडलं ?

कोल्हापुरात काही युवकांनी वादग्रस्त स्टेटस ठेवले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यातून दोन गट आमने-सामने आले. शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक झाल्याच्या घटना देखील घडल्या.

परिणामी कायदा व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पाोलिसांची मोठी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मात्र परिस्थिती चिघळल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. कोल्हापुरातील परिस्थितीवरून देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाला महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com