Pandharpur News : भाविकांनाे ! चंद्रभागा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; कचरा करणा-यांवर दंडात्मक कारवाईस प्रारंभ

चंद्रभागा स्वच्छतेसाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Pandharpur, chandrabhaga river
Pandharpur, chandrabhaga riversaam tv
Published On

Pandharpur News : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील चंद्रभागा नदीचे (chandrabhaga river) पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. चंद्रभागेची स्वच्छता (cleanliness drive of chandrabhaga river in pandharpur) केल्यानंतर आता नदीपात्रात निर्माल्य आणि कपडे टाकण्यास बंदी केली आहे. (Maharashtra News)

Pandharpur, chandrabhaga river
Shrirampur Bandh : अखेर कृती समितीने दिली येत्या शनिवारी श्रीरामपूर बंदची हाक; जाणून घ्या कारण

आषाढी यात्रेच्या (Ashadhi Wari 2023) पार्श्वभूमीवर पंढरपुरातील चंद्रभागा नदी पात्र आणि पाणी स्वच्छ ठेवण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. बुधवारी एकाच दिवसात नदीपात्र स्वच्छ करून सूमारे 48 टन कचरा आणि निर्माल्य गोळा केले.

चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखले जावे तसेच परिसरात स्वच्छता राखली जावी यासाठी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे (solapur collector tushar thombare) यांनी ठाेस पावले उचलली आहेत. नदी पात्रात कचरा टाकण्या-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

Pandharpur, chandrabhaga river
Udayanraje Bhosale : ...तर जनतेच्या अस्मितेवर तो घाला असेल; उदयनराजेंच्या पाेस्टची जनमाणसांत चर्चा

या नव्या नियमाची पालिकेने तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी 100 हून अधिक भाविकांकडून नदीपात्रात निर्माल्य आणि जूने कपडे टाकल्या प्रकरणी सुमारे 2200 रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली‌.

दरम्यान चंद्रभागा स्वच्छतेसाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com