रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद; एकाला धारदार शस्त्राने वार करून संपवलं, जालन्यात खळबळ

Jalna shocking : जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद झाला. या वादातून एकाला धारदार शस्त्राने वार करून संपवल्याची घटना घडली.
jalna news update
jalna newsSaam tv
Published On
Summary

जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून वाद

जालन्यात वादाचे रूपांतर हाणामारीत एका तरुणाची हत्या

हाणामारीत दोन जण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

अक्षय शिंदे,साम टीव्ही

जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटाचा वाद टोकाला गेला. या वादातून एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले. हत्येच्या घटनेने जालना शहरातील मोतीबाग परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद होऊन एकची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आलीये. रवी अशोक लाड (वय 28 वर्ष) असं मृत तरुणाचे नाव आहे. हाणामारीच्या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झालेत. जालनाच्या शहरातील मोतीबाग परिसरात रविवारी रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला होता.

टकरी लावण्यावरून सायंकाळच्या सुमारास दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले. त्यानेतर झाल्याच्या वादाचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. या मारहाणीत एका गटातील तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यामध्ये प्रेम लाड (वय 20 वर्ष) आणि नरेश अवघड (वय 20 वर्ष) हे सुद्धा जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केलीये.

अल्पवयीन मुलाकडून चक्क ४४ हजार रुपयांची बॅग लंपास

वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरात दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना समोर आलीये. दिग्रस चौक परिसरातील पैराडाईज साडी सेंटर या कपड्यांच्या दुकानातून एका अल्पवयीन मुलाने महिलेच्या आड चक्क ४४ हजार रुपयांची बॅग लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com