कौतुकास्पद : प्रजासत्ताकदिनी राज्याचे प्रतिनिधित्व करणारा चित्ररथ, साकारला यवतमाळच्या तरूणाने

प्रजासत्ताक दिनी (Republic Day) राजपथावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चित्ररथातील विविध शिल्प यवतमाळ येथे साकारण्यात आले आहे.
कौतुकास्पद : प्रजासत्ताकदिनी राज्याचे प्रतिनिधित्व करणारा चित्ररथ, साकारला यवतमाळच्या तरूणाने
कौतुकास्पद : प्रजासत्ताकदिनी राज्याचे प्रतिनिधित्व करणारा चित्ररथ, साकारला यवतमाळच्या तरूणाने संजय राठोड

संजय राठोड -

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा (Yavatmal district) हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र कला क्षेत्राच्या बाबतीत यवतमाळ देखील मागे नाही हे कलावंत पुन्हा पुन्हा सिद्ध करीत असतात नुकताच याचा प्रत्यय आला असून प्रजासत्ताक दिनी (Republic Day) राजपथावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चित्ररथातील विविध शिल्प यवतमाळ येथे साकारण्यात आले आहे.

प्रसिद्ध कलावंत भूषण मानेकर (Bhushan Manekar) यांच्या कला दालनामध्ये चित्ररथातील जैवविविधताची निर्मिती करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथील राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथ साकारण्याचा मान भूषणसह त्याचा सहकाऱ्याला मिळाला आहे.

कौतुकास्पद : प्रजासत्ताकदिनी राज्याचे प्रतिनिधित्व करणारा चित्ररथ, साकारला यवतमाळच्या तरूणाने
Vishal Fate : विशाल फटेची 3 बँकखाती गोठवली; फटे विरुद्धच्या तक्रारींची संख्या 105 वर

विशेष म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील एका कंपनीने हा चित्ररथ तयार करण्याचा कंत्राट घेतलं होतं. यामधील शिल्प भूषण मानेकर यांच्या कलादालनामध्ये तयार करण्यात आले. दिल्ली येथे संपूर्ण संच पोहचला असून त्या ठिकाणी या सर्व भागांना एकत्रित (असेम्बलिंग) करण्यात आले. आज या चित्र रथाची पहिली झलक पहावयास मिळाली आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ येथील कलावंतांना हा चित्ररथ साकारण्याचा मान मिळाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com