सोलापूर : शेअर मार्केटच्या (Share Market) गुंतवणुकीत महिना 5 ते 25 % रिटर्न्स मिळवून देण्याचे आमिष दाखवत, कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा 'बार्शीचा हर्षद मेहता' विशाल फटे (Vishal Fate) याचे तीन बँकांमधील खाती गोठवण्यात आली आहेत. आत्तापर्यंत त्याच्याविरुद्ध उस्मानाबाद, पुण्यातूनही तक्रारी दाखल झाल्या असून, तक्रारींची संख्या आता 105 वर गेली आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सध्या फटे प्रकरणाचा तपास सुरु आहे. फटेचे एकुण सहा बँकांमध्ये आर्थिक व्यवहार चालत होते. सहापैकी सर्वात जास्त उलाढाल असलेल्या तीन राष्ट्रीयकृत बँकांमधील खाती (Bank Acccounts) पोलिसांनी गोठवली आहेत. तर बाकीच्या तीन बँकांमध्ये किरकोळ व्यवहार दिसून आले आहेत. सर्व बँकांचे स्टेस्टमेंट काढुन घेण्यात आलेले आहेत. मोबाइल, लॅपटॉप, महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर फसवणूकीचा आकडा 18 कोटींपर्यंत गेला होता. मात्र, तक्रारी वाढल्याने 22 कोटी 3 लाख 58 हजार 342 रुपयांपर्यंत गेलेली आहे. त्याचबरोबर अधिकाधिक फसवल्या गेलेल्या लोकांनी समोर येऊन तक्रारी दाखल कराव्यात असं आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केलं आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.