Chitra Wagh Tweet: 'नवरा गेल्यानंतर गंगेवर जाऊन...'; चित्रा वाघ यांनी वादात उडी घेत सुचवला नवा शब्द

Chitra Wagh Latest News: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या वादात उडी घेत नवा शब्द सुचवला आहे.
Chitra Wagh News
Chitra Wagh NewsSaam TV

Chitra Wagh Reaction: महाराष्ट्राचे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधवांचा सन्मान करण्यासाठी नवा शब्द सुचवला आहे. लोढा यांनी नवा शब्द सुचवल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून विरोधकांनी लोढा यांच्यावर टीका केली आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या वादात उडी घेत नवा शब्द सुचवला आहे. (Latest Marathi News)

विधवांना गंगा भागीरथी म्हणावे यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधवांचा सन्मान करण्यासाठी नवा शब्द सुचवल्याने अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी या लोढा यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. या वादात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेत नवा शब्द सुचवला आहे .

चित्रा वाघ यांनी ट्विट करत 'श्रीमती' हा नवा शब्द वापरण्याचा सल्ला मंत्री लोढा यांना दिला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, ' गं.भा. म्हणजे गंगा भागीरथी…नवरा गेल्यानंतर गंगेवर जाऊन केशवपन केलेल्या स्त्रीला गं.भा. म्हणायची, लिहायची पद्धत होती. याऐवजी कोणत्याही सज्ञान स्त्रीला कुमारी सौभाग्यवती श्रीमती ... असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं “श्रीमती” म्हणायला काय हरकत आहे'.

मंगलप्रभात लोढा ही काय बिल्डिंगची स्कीम नाही; तृप्ती देसाई भडकल्या

विरोधकांनी या लोढा यांच्या प्रस्तावावर टीकास्त्र सोडलं आहे. याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील टीका केली आहे.

देसाई म्हणाल्या, राज्याचे महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांना गंगा,भागीरथी हे शब्द वापरावेत अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. खरंतर विधवा महिलांचा प्रश्न ज्वलंत आहे. त्यांच्या वाट्याला आधीच भरपूर दुःख आलेलं असतं आणि त्यातच अशा पद्धतीने नद्यांची नावे पाठवणे म्हणजे विधवा महिलांची थट्टा केल्यासारखे आहे.यामुळे त्यांना समाजात ट्रोलसुद्धा केले जाऊ शकते'.

Chitra Wagh News
Sushma Andhare यांनी Mangal Prabhat Lodha यांच्यावर साधला निशाणा

'मंगलप्रभात लोढा हे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि म्हणूनच बिल्डिंगची स्कीम करताना नद्यांची नावे अनेक वेळा दिली जातात. त्यामुळे मला त्यांना सांगायचे आहे की," ही काय बिल्डिंगची स्कीम नाही, ज्याला तुम्ही नद्यांची नावे देणार आहात" हा विधवा महिलांचा ज्वलंत प्रश्न आहे.अशी थट्टा करण्यापेक्षा विधवा महिलांचे अनेक योजना ज्या रखडले आहेत, त्या मार्गी लावल्या पाहिजेत. त्यांच्या सन्मानासाठी अनेक कामे कृतीत केली पाहिजेत आणि गंगा,भागीरथी ही नावे ताबडतोब तुम्ही रद्द केली पाहिजे, अशा देसाई पुढे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com