Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट; मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले मोठं आश्वासन!

Shambhuraj Desai News : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांची बैठक घेण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट; मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले मोठं आश्वासन!
Shambhuraj Desai News
Published On

Manoj Jarange Patil Hunger Strike :

एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यावर चर्चा झाली. गुन्हे मागे घेण्यावर चर्चा झाली आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर याबाबत चर्चा होईल, असे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिलेय.

मुंबईमध्ये काल मराठा समाजाचे आंदोलक आले होते. वर्षा निवास स्थानावर त्यांच्यासोबत बैठक पार पडली. पुण्यातून आलेल्या सात सदस्यांच्या मंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली -

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा

मुंबई मंडळ आणि हैदराबाद संस्थानचे गॅजेटवर

कॅबिनेट झाल्यावर सविस्तर बैठक होईल ?

गतीने कार्यवाही व्हावी असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील आणि आम्ही काम वेगाने सुरू केले आहे. पण दोन वेगळे विषय आहे. मराठा समजाला आरक्षण मिळावे अशी पहिली मागणी होती. त्याप्रमाणे ती मागणी पूर्ण केली आहे. मराठा समजाला १० टक्के आरक्षण दिले आणि ते टिकले.

ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लावलाय ते सांगा, कुठेही धक्का लावला नाही, असे शंभूराज देसाई केले. दुसऱ्या कोणाचाही आरक्षणाला धक्का ना लावता आरक्षण दिले आहे. आता जी मागणी आहे सगेसोयरे आणि हैद्राबाद गॅजेट लागू करावे, अशी मागणी आहे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी सलग सहाव्यांदा उपोषण सुरू केलंय. यावेळी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांनी टार्गेट केलंय.

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट; मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले मोठं आश्वासन!
Manoj Jarange Health Update: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रक्तातील शुगर कमी, चालताही येईना

सरकारने वेळेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेलाय. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही म्हणून आमरण उपोषणाला बसलोय. ही देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी आहे. संधी दिल्यावर पण काम नाही केलं तर थोबाड उचकता येणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com