Cm Shinde: पंतप्रधानांचा खोटा प्रचार करणं हा त्यांचा अजेंडा: मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Chief Minister Eknath Shinde : छत्रपती संभाजीनजर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath Shinde saam tv

Chief Minister Eknath Shinde Press Conference In n Chhatrapati Sambhajinagar: उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासाठी दुसरं काही नाहीये. पंतप्रधान मोदींविषयी खोटा प्रचार करणं हा त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे ते पंतप्रधान मोदींविषयी अपप्रचार करत आहेत. आम्ही कार्यकर्ते असून आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी सभा घेत आहोत. त्याच्यासारखं घरात बसून फेसबूक लाईव्ह करायचं का? अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभरात मुख्यमंत्र्यांचा दौराचा चालूय. मुख्यमंत्री शिंदे आज ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी मराठा नेते विनोद पाटील यांची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरमधून विनोद पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिल्यानंतर पाटील यांना नाराजी व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी आज त्यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर केलीय.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलीय. उद्धव ठाकरे आधी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळायची आता तेच त्यांचा खोटा प्रचार करत आहेत. इतक्या फास्ट रंग बदलणारे सरडे पहिल्यांदा पाहिले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय.

आता तेच मोदींविषयी खोटा प्रचार करत आहेत. इतक्या फास्ट रंग बदलणारे सरडे पहिल्यांदा पाहिला नसल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. एकदा मोदींची स्तुती करणं आणि नंतर आरोप करणं ही बेगडी भूमिका आहे. पंतप्रधान मोदी सत्तेत आले तर संविधान बदलतील, संविधानात बदल होणार वावडी विरोधकांकडून उठवली जात आहे. मात्र संविधानाला कोणीच हात लावणार नाही. ते कोणीच बदलणार नाही,असा खुलासा खुद्द पंतप्रधान मोदींनी केलाय. सूर्य-चंद्र असेपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही. बदलणार नाही.

बाबासाहेबांचा संविधान दिन यांना ५०-६० वर्ष साजरा करता आला नाही. ते बाबासाहेबांना विसरले. पण मोदींनी २०१५ पासून संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली. बाबासाहेबांच्या राज्यघटनेवर आपला राज्यकारभार सुरूय. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या प्रचारावर कोणी विश्वास ठेवणार नाही, आणि कोणी ठेवू नये. आपल्या देशातील संविधान सर्वक्षेष्ठ संविधान असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Chief Minister Eknath Shinde
PM Modi : आम्ही त्यांच्या शिव्याही खाऊ आणि देशसेवाही करू: पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com