CM Eknath Shinde: आतापर्यंत चार क्रांती झाल्या, आता ग्रीन गोल्ड क्रांती होणार: मुख्यमंत्री शिंदे

CM Eknath Shinde : महाराष्ट्र राज्याला २०२४ चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात कशाप्रकारे कृषी क्षेत्रावर काम केलं जात आहे, त्याची माहिती दिली.
CM Eknath Shinde: आतापर्यंत चार क्रांती झाल्या, आता ग्रीन गोल्ड क्रांती होणार: मुख्यमंत्री शिंदे
CM Eknath ShindeSaam Tv

प्रमोद जगताप, साम प्रतिनिधी

आता तापमान वाढीचा काळ संपला आता बर्निंग सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबू शेती करण्याचं सांगितलं जात आहे. बांबू जास्त कार्बन शोषून घेतं, ⁠ऑक्सिजन जास्त देते. त्यामुळे आम्ही राज्यात शेतकऱ्यांना बांबूची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. त्या पार्श्वभूमीवर मिशन बांबू सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत चार क्रांती झाल्या, आता ग्रीन क्रांती होणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दिल्लीत झाला असून या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला २०२४ चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ब्राजील, अल्जीरिया, नीदरलॅड देशाचे राजदूत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालॅड राज्यातील मंत्री देखील उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार शेती संदर्भात सरकारने सुरु केलेल्या नवीन योजना, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सुरु केलेल्या योजनांसाठी दिला गेला. या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात सुरू असलेल्या कृषी योजनांची माहिती दिली. राज्यात मिशन बांबू सुरू करण्यात आलं. ⁠एक हेक्टर बांबू लावण्यासाठी आमचे सरकार सबसीडी देत आहे. आमचे पाशा पटेल यावर विशेष काम करत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आतापर्यंत चार क्रांती झाल्या आहेत . आता ग्रीन गोल्ड क्रांती होईल. केंद्र सरकारने बांबूला प्राथमिकता द्यावी, असे आम्ही केंद्रीय कृषी मंत्र्यांना सांगितल्याचं शिंदे म्हणाले. तसेच कृषी आणि शेतकरी यांच्यासाठी ज्या योजना सुरू केल्या त्या आम्ही प्रामाणिकपणे राबवल्या आहेत. ⁠पीएम किसान सन्मान निधी आम्ही दुप्पट केला आहे. अर्थसंकल्पात पंपाने शेती करणाऱ्यांना मुफ्त वीज देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com